मुंबई Maharashtra Cabinet Decision : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. यावेळी एक दोन नाहीतर तब्बल 24 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. तर आजदेखील 38 लोक कल्याणकारी निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत.
कोतवालांच्या मानधनात 10 टक्के वाढ : यात विशेष म्हणजे मागील बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या वेतनात दुप्पट वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज कोतवालांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर ग्राम रोजगार सेवकांना आता दर महिन्याला आठ हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख… pic.twitter.com/BUTMzoSgny
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 30, 2024
कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण : दरम्यान, राज्यातील महायुती सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रभावित करण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचा असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनुकंपा धोरणही लागू करण्यात आले आहे. याचबरोबर ग्राम रोजगार सेवकांना आता महिन्याला आठ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार असून, प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळं कोतवाल आणि राज्यातील ग्राम रोजगार सेवकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असताना आता राज्य सरकार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत.
आजच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते?
- कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, अनुकंपा धोरणही लागू
- ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान
- ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार
- एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
- ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार असून, १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
- ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
- देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना
- भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड आणि वाढवण येथील जागा
- नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
- रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
- राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
- जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता, ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
- लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
- धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन
- रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार
- एमएमआरडीएला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
- केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार, दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार
- पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक विकसित करणार
हेही वाचा -
- "विधानसभेत महाविकास आघाडीचा एन्काऊंटर..."; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र - CM Eknath Shinde
- ‘धर्मवीर 2’वरुन रोहित पवारांची सरकारवर खरमरीत टीका; म्हणाले, "निवडणुकीपूर्वी केलेला स्टंट..." - Dharmaveer 2
- शिंदे गटानं गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा-संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Sanjay Raut news today