मुंबई - Mithun Chakraborty : चित्रपटसृष्टीवर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर रोजी मिथुन यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. या बहुमानाबद्दल कातर स्वरात त्यांनी "माझ्याकडे शब्द नाहीत, मला हसता आणि रडता येत नाही. मी कोलकात्यातील एका छोट्या भागातून आलो आहे. एवढ्या मोठ्या पुरस्कारानं माझा सन्मान होईल, असं कधीच वाटलं नव्हतं. मी एवढंच सांगेन की, हा सन्मान मी माझ्या कुटुंबाला आणि सर्व चाहत्यांना समर्पित करणार आहे." अशी प्रतिक्रिया दिली.
#WATCH कोलकाता, पश्चिम बंगाल: दादा साहब फाल्के पुरस्कार से सम्मानित होने की घोषणा पर अभिनेता और भाजपा नेता मिथुन चक्रवर्ती ने कहा, " मेरे पास शब्द ही नहीं हैं...मैंने इसकी कल्पना भी नहीं की थी। मैं इसे अपने परिवार और पूरे विश्व में अपने प्रशंसकों को समर्पित करता हूं..." pic.twitter.com/MhDOb4GVFK
— ANI_HindiNews (@AHindinews) September 30, 2024
पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन : दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मिथुन चक्रवर्ती यांचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदींनी 'एक्स' पोस्टमध्ये लिहिलं, 'मला आनंद होत आहे की, मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अद्वितीय योगदानाची दखल घेऊन प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.' आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मिथुनदा यांनी हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी भाषांमधील 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान मिळवणं प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. मिथुनदांनी कारकिर्दीच्या 48 व्या वर्षी या स्वप्नाला गवसणी घातली.
Mithun Da’s remarkable cinematic journey inspires generations!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 30, 2024
Honoured to announce that the Dadasaheb Phalke Selection Jury has decided to award legendary actor, Sh. Mithun Chakraborty Ji for his iconic contribution to Indian Cinema.
🗓️To be presented at the 70th National…
मिथुन चक्रवर्ती यांचे पुरस्कार : मिथुन चक्रवर्ती यांना तीनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्याचा पहिला चित्रपट 'मृगया'साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचे 1980 आणि 90 च्या दशकातील अनेक चित्रपट हिट झाले आहेत. ॲक्शन आणि डान्सवर आधारित असलेले त्यांचे चित्रपट अनेकांना या काळात पसंत पडले होते. 1982मध्ये 'डिस्को डान्सर' या सुपरहिट चित्रपटाद्वारे त्यांना देशभरात ओळख मिळाली. दरम्यान त्यांचा 'अग्निपथ','प्यार झुकता नहीं', 'गुंडा', 'द ताशकंद फाइल्स' या चित्रपटामधील अभिनय हा खूप दमदार होता. त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार 1992मधील चित्रपट 'तहादेर कथा'साठी मिळाला आहे. याशिवाय तिसरा राष्ट्रीय पुरस्कार 1998मध्ये आलेल्या 'स्वामी विवेकानंद' चित्रपटासाठी त्यांना मिळाला आहे. 2024मध्ये त्यांना 'पद्मभूषण' या देशातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं. ते फक्त चित्रपटांमध्येच नाही, तर टीव्ही शो आणि राजकारणातही सक्रिय आहे.
हेही वाचा :