कानपूर Fastest 50 and 100 Runs in Test : भारत आणि बांगलादेश क्रिकेट यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कानपूर इथं खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळं केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. चौथ्या दिवशी (सोमवार) बांगलादेशचा पहिला डाव सुरु झाला तेव्हा भारताच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. पाहुण्या संघ केवळ 233 धावांवरच मर्यादित राहिला. यानंतर भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात झंझावाती सुरुवात करुन कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
🚨FASTEST 100 IN TEST CRICKET. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
India beat their own record for the fastest 100 in Test cricket - 103/1 in just 10.1 overs. 🇮🇳 pic.twitter.com/JM0qbhPxyr
रोहितचा पहिल्याच बॉलवर षटकार : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी तुफानी फलंदाजी करत बांगलादेशची गोलंदाजी उद्ध्वस्त केली. यशस्वीनं हसन महमूदच्या चेंडूवर सलग तीन चौकार मारले. यानंतर दुसऱ्या षटकात रोहितला स्ट्राइक मिळाल्यावर त्यानं षटकार लगावत आपले खाते उघडले. हिटमॅननं सलग दोन चेंडूंवर षटकार मारुन खालिद अहमदला चकित केलं. रोहितच्या पहिल्या षटकारात चेंडू तंबूत अडकला.
HISTORY WRITTEN BY ROHIT AND JAISWAL IN KANPUR. 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
INDIA 51/0 IN JUST 3 OVERS - THE FASTEST EVER IN TEST CRICKET..!!! 🤯 pic.twitter.com/Pmgldc2jME
अवघ्या 3 षटकांत 50 तर 10 षटकांत 100 धावा : रोहित आणि यशस्वी यांनी मिळून भारताच्या 50 धावा अवघ्या 3 षटकांत पूर्ण केल्या. कसोटी इतिहासातील कोणत्याही संघाचं हे सर्वात जलद अर्धशतक आहे. याबाबतीत भारतानं इंग्लंडचा विक्रम मोडला. इंग्लिश संघानं यंदा वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 4.2 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडनं 4.3 षटकांत 50 धावा केल्या होत्या.
31 BALL FIFTY BY YASHASVI JAISWAL.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
- Jaiswal, the unstoppable force in Test cricket. Yet another sensational innings by the youngster. 👏 pic.twitter.com/1zD3xNerro
कसोटीतील सर्वात जलद अर्धशतक :
- 3.0 षटकं - भारत विरुद्ध बांगलादेश, 2024 आज
- 4.2 षटकं - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2024
- 4.3 षटकं - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1994
- 5.0 षटकं - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, 2002
- 5.2 षटकं - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, 2004
This is some serious hitting by our openers 😳😳
— BCCI (@BCCI) September 30, 2024
A quick-fire 50-run partnership between @ybj_19 & @ImRo45 👏👏
Live - https://t.co/JBVX2gyyPf… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/1EnJH3X5xA
सर्वात जलद 100 धावांची नोंद : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 धावा करण्यासोबतच भारतीय संघानं सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही मोडला आहे. भारतानं अवघ्या 10.1 षटकात 100 धावांचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे यात भारतीय संघानं स्वतःचाच विक्रम मोडला आहे. भारतानं 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 12.2 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या होत्या. वर्षभरातच भारतानं हा विक्रम पुन्हा मोडीत काढला. त्यावेळी भारतीय संघानं श्रीलंकेचा विक्रम मोडला होता.
रोहित-यशस्वी जोडीनं रचला मोठा विक्रम : रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भागीदारीत किमान 50 धावा जोडून दोघंही सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले. कानपूरमध्ये रोहित आणि यशस्वी यांनी अवघ्या 23 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. यात त्यांचा स्कोअरिंग रेट 14.34 होता. या दोघांनी इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि बेन डकेटचा विक्रम मोडीत काढला. एजबॅस्टन इथं वेस्ट इंडिजविरुद्ध स्टोक्स आणि डकेट यांनी 44 चेंडूत 87 धावांची नाबाद भागीदारी केली होती. या काळात त्यांचा स्कोअरिंग रेट 11.86 होता.
हेही वाचा :