ETV Bharat / state

रेल्वे महाव्यवस्थापकाचा औरंगाबाद दौरा; मॉडेल रेल्वेस्थानकाचे काम ६ महिन्यात सुरू - DEMAND

गेल्या अनेक वर्षांपासून मॉडेल रेल्वेस्थानकांचे काम अपूर्ण आहे, हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पुढील टप्प्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मुंबईसाठी दररोज रेल्वे सुरु करण्याच्या मागणीकडे गांभीर्याने विचार सुरू आहे.

रेल्वे महाव्यवस्थापक
author img

By

Published : Mar 17, 2019, 3:55 PM IST

औरंगाबाद - मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम ६ महिन्यात सुरू होणार आहे. तसेच औरंगाबादकरांची मागणी लक्षात घेता, मुंबईसाठी दररोज एक नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही रेल्वे लवकरच सुरू करण्यात यश येईल, अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थपक गजानन मल्या यांनी औरंगाबाद दौऱ्याप्रसंगी दिली.

रेल्वे महाव्यवस्थापक

गेल्या अनेक वर्षांपासून मॉडेल रेल्वेस्थानकांचे काम अपूर्ण आहे, हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पुढील टप्प्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मुंबईसाठी दररोज रेल्वे सुरु करण्याच्या मागणीकडे गांभीर्याने विचार सुरू आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. येत्या काळात मुंबईसाठी एक रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे यावेळी मल्या यांनी सांगितले. औरंगाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी करताना परिसरातील एका चेंबरमधून घाणपाणी वाहत होते, मल्या यांना त्याच पाण्यातून वाट काढावी लागली. त्यामुळे मॉडेल रेल्वेस्थानकाचे स्वप्न पाहणारे औरंगाबाद स्थानक स्वच्छतेच्या बाबतीत किती मागासलेले आहे. याची कल्पना मल्या यांना नक्कीच आली.

Intro:औरंगाबाद मॉडेल रेल्वेस्थंकाचे दुसऱ्या टप्प्यातील काम येत्या 6 महिन्यात सुरू होणार आहे. तसेच औरंगाबाद करांची मागणी लक्षात घेता.मुंबईसाठी डेली एक नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नवीन रेल्वे लवकरच सुरू करण्यात यश येईल अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थपक गजानन मल्या यांनी औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना दिली.


Body:मागील अनेक वर्षांपासून मॉडेल रेल्वेस्थंकाचे काम अपूर्ण आहे हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे.येत्या सहा ते दहा महिन्यात मॉडेल रेल्वेस्थंकाच्या पुढील टप्प्यास सुरुवात होणार आहे. त्याच बरोबर मुंबईसाठी डेली रेल्वे सुरु करण्याच्या मागणीकडे गांभीर्याने विचार सुरू आहे.औरंगाबाद येथून मुंबईसाठी प्रचंड प्रवासी संख्या लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. येत्या काळात मुंबई साठी एक रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे यावेळी मल्या यांनी सांगितले


Conclusion:औरंगाबाद रेल्वे स्थंकाची पाहणी करीत अ सताना परिसरातील एका चेंबर मधून घाणपाणी वाहत असल्याने मल्या यांना त्याच पाण्यातून वाट काढावी लागली.त्यामुळे मॉडेल रेल्वेस्थंकाचे स्वप्न पाहणारे औरंगाबाद स्थानक स्वच्छतेच्या बाबतीत किती मागासलेले आहे.याची कल्पना मल्या यांना नक्कीच अली असावी.



ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.