अमरावतीत 366 किलो अवैध गांजा जप्त - अमरावती 366 किलो अवैध
अमरावती गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना दोन चारचाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. एम एच 31 सी आर 4494 लोगन कार, एम एच तीस 1968 असेंट कार मध्ये 36 लाख 41 हजार रुपये किमतीचा 366 किलो गांजा जप्त केला आहे.
![अमरावतीत 366 किलो अवैध गांजा जप्त अवैध गांजा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11239991-891-11239991-1617277598540.jpg?imwidth=3840)
अमरावती - शहरातील नागपुरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत इक्बाल चौकात दोन चारचाकी वाहनातून भर दिवसा अवैध पद्धतीने गांजाची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत शहर पोलिसांनी तब्बल 366 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. शिवाय दोन वाहन जप्त केले असून हा गांजा 46 लाखांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर भर दिवसा होणारी गांजाची तस्करी त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत तपास सुरू केला आहे.
हेही वाचा-ठाण्यात बँक कर्मचाऱ्यांनीच मारला खातेदारांच्या रक्कमेवर डल्ला
हेही वाचा-लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचा खून, 17 दिवसांनी घटना उघडकीस