ETV Bharat / sitara

२५ वर्षांपूर्वी सुष्मीता सेन बनली होती मिस युनिव्हर्स, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने शेअर केला हा 'फोटो'

रोहमन शॉल हा सुष्मीतापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. तरीही त्या दोघांची बॉन्डिंग खूप चांगली असल्याचे दिसते. सुष्मीता आणि रोहमन बऱ्याच कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसतात. ते एकमेकांसोबत असलेले रोमॅन्टिक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतात.

author img

By

Published : May 21, 2019, 11:57 AM IST

२५ वर्षांपूर्वी सुष्मीता सेन बनली होती मिस युनिव्हर्स, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने शेअर केला हा 'फोटो'

मुंबई - आपल्या सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सुष्मीता सेन. २५ वर्षांपूर्वी आपल्या टॅलेंट आणि सौंदर्याने सुष्मीताने 'मिस युनिव्हर्स' हा किताब पटकावला होता. हा किताब पटकावणारी ती पहिली भारतीय महिला बनली होती. सुष्मीता सध्या तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रोहमनने सुष्मीताचा २५ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Sushmita Sen
रोहमन शॉलने शेअर केलेली पोस्ट
Sushmita Sen
रोहमनच्या पोस्टवर सुष्मीताचे उत्तर

रोहमन शॉल हा सुष्मीतापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. तरीही त्या दोघांची बॉन्डिंग खूप चांगली असल्याचे दिसते. सुष्मीता आणि रोहमन बऱ्याच कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसतात. ते एकमेकांसोबत असलेले रोमॅन्टिक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सुष्मीता आणि रोहमन गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. रोहमन सुष्मीताच्या दोन्ही दत्तक मुलींचीदेखील काळजी घेताना दिसतो. अलिकडेच दोघांनीही अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिली. त्याचा एक व्हिडिओ देखील तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ते दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू असतात. असे असले तरीही अद्याप या दोघांनी त्यांच्या लग्नाची कोणतीही घोषणा केलेली नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.