मुंबई : बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका मोस्ट वाँटेड आरोपीला बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. सलमान खान हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोस्ट वाँटेड सुखा याला हरियणातील पानिपत इथून पकडल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनं वृत्तसंस्थेला दिली आहे.
मोस्ट वाँटेड सुखाला पानिपत इथून अटक : सलमान खान याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी सुखा हा मोस्ट वाँटेड आरोपी आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई पोलीस आरोपी सुखाच्या मागावर होते. मात्र तो पोलिसांना आढळून येत नव्हता. अखेर नवी मुंबई पोलिसांनी मोस्ट वाँटेड सुखा याला हरियाणातील पानिपत इथून पकडण्यात यश आलं. आरोपी सुखाला मुंबईत आणण्यात आलं असून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केलं जाईल, असंही या पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं.
फार्महाऊसवर जाताना लक्ष्य करण्याचा कट : सलमान खान हा त्याच्या पनवेलजवळील फार्म हाऊसवर जाताना त्याला लक्ष्य करण्यात येणार असल्याचा कट आरोपींनी या वर्षी जून महिन्यात रचला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला. पोलिसांनी सलमान खान याच्या वांद्रे इथल्या गॅलक्सी निवासस्थानाबाहेर एप्रिल 2024 मध्ये गोळीबार झाल्यानंतर हा कट रचण्यात आला होता.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ : कुप्रसिद्ध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानं सलमान खान याला काळविट मारल्याप्रकरणी धमकी दिली आहे. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोईच्या मारेकऱ्यानं हत्या केली. त्यामुळे सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा :