हैदराबाद Google Nuclear Power Deal : गुगलनं अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी (Google signs nuclear power deal) केलीय. त्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसंच या कराराविरोधा काहींनी उघड टिका करण्यास सुरवात केलीय. Google नं त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालींच्या वाढत्या ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या (SMRs) कडून वीज खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. एकाधिक SMRs कडून वीज खरेदी करण्याचा हा जगातील पहिला कॉर्पोरेट करार आहे. गुगल सहा ते सात अणुभट्ट्यांमधून एकूण 500 मेगावॅट वीज खरेदी करणार आहे.
करारावर टीका : Google चे ऊर्जा आणि हवामान विभागाचे वरिष्ठ संचालक मायकेल टेरेल म्हणाले, "मला वाटतं की अणुऊर्जा आपली मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते". Google च्या आर्किटेक्चरसाठी विश्वासार्ह, स्वच्छ ऊर्जा सुनिश्चित करण्यासाठी आमचा हेतू आहे, असं ते म्हणाले. उह्रिग यांनी असंही अधोरेखित केले की या कराराला न्यूक्लियर रेग्युलेटरनं मान्यता दिलेली नाही.
500 मेगावॅट वीज मिळेल : हा प्लांट यूएस-आधारित स्टार्टअप कैरोस पॉवरद्वारे विकसित केला जाणार आहे. या कॉर्पोरेट करारामुळं "यूएस वीज ग्रिड्सना 500 मेगावॅट नवीन 24/7 कार्बन मुक्त वीज" मिळेल. यूएस मधील एक सामान्य अणुभट्टीत सुमारे 1 GW (गीगावॉट) वीज तयार होते, परंतु विजेचे प्रमाण विशिष्ट क्षमतेवर अणुभट्टी किती काळ चालते यावर अवलंबून असतं.
AI डेटा सेंटरचा ऊर्जा वापर वाढणार : आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर्स कुख्यातपणे उच्च पातळीची वीज वापरण्यासाठी ओळखली जातात. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या मते, 2022 मध्ये अशा डेटा सेंटर्सचा वीज वापर सुमारे 460 टेरावॅट तास होता आणि 2026 मध्ये तो 620-1050 TWh पर्यंत वाढू शकतो. IDC च्या मते, AI डेटा सेंटरचा ऊर्जा वापर 44.7 वाढण्याचा अंदाज आहे.
AI मुळं वीजेची मागणी वाढतेय : AI तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळं वीजेची मागणी वाढतेय. या वर्षाच्या सुरुवातीला, ऍमेझॉननं टॅलोन एनर्जीकडून अणु-शक्तीवर चालणारं डेटा सेंटर विकत घेतलं होतं. तसंच मायक्रोसॉफ्टनं थ्री माईल आयलंड, पेनसिल्व्हेनिया येथे अणुभट्टी पुनरुज्जीवित करण्यात मदत करण्यासाठी कॉन्स्टेलेशन एनर्जीसोबत करार केला होता. लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या पारंपारिक अणुभट्ट्यांपेक्षा लहान, अधिक लवचिक, अधिक किफायतशीर असू शकतात. पारंपारिक अणु संयंत्रांप्रमाणं, SMRs साइटवर नाही, त्या भट्या कारखान्यांमध्ये तयार केलेल्या केल्या जातात. ज्यामुळं बांधकाम खर्च आणि वेळ कमी होऊ शकतो.
हे वाचलंत का :