ठाणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. युती आणि आघाडीमधील जागा वाटप अद्याप जाहीर झालेले आहे. या जागा वाटपावरून काही ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असाच संघर्ष ठाणे शहर विधानसभा मतदार संघात होण्याची चिन्हं निर्माण झाली आहे.
ठाण्यात शिवसेनेकडून पोस्टरबाजी : ठाण्यातील माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी ‘दादाचं काम बोलतंय’असे पोस्टर्स ठाणे शहर मतदार संघात जागोजागी लावले. हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. इतकंच नाही तर भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.
- 2014 मध्ये (शिवसेना एकसंघ असताना) शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात ठाणे शहर मतदार संघातून उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत भाजपाचे संजय केळकर विजयी झाले. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतही केळकर यांनी विजय संपादन केले होते.
निवडणुकीत उभं राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. निवडणुकीत कोणीही उभं राहून आपली ताकद दाखवू शकतो- संजय केळकर, भाजपा आमदार
मुंब्रा कळवामधूनही शिवसेनेचे नेते इच्छुक : मुंब्रा कळवा मतदार संघाच्या उमेदवारीसाठीदेखील शिवसेना शिंदे पक्षाचे नेते राजन किणे इच्छुक आहेत. जर शिंदे पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उभा राहून निवडणूक लढविण्याची तयारी राजन किणे यांनी सुरू केलीय. तर या मतदारसंघात अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, या निवडणुकीत ठाण्यातून मनसेचे अविनाश जाधव हे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळं जर महायुतीत बिघाडी झाली तर निवडणुकीचा निकाल वेगळा असू शकतो.
हेही वाचा -