मुंबई : 16 ऑक्टोबरच्या रात्री फेमिना मिस इंडिया 2024चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. भारताच्या मोस्ट आयकॉनिक ब्युटी पेजंटचा हा 60वा वर्धापन दिन असून या स्पर्धेत 30 राज्यांतील सुंदरी होत्या. आता फेमिना मिस इंडियाचा खिताब हा उज्जैनच्या निकिता पोरवालनं जिंकला आहे. मुंबईत वरळी येथे आयोजित बुधवारी झालेल्या फेमिना मिस इंडिया 2024च्या स्पर्धेत निकितानं मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर तिच्यावर आता अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत .निकिता ही एक अभिनेत्री असून ती वयाच्या 18व्या वर्षापासून अभिनय करत आहे.
फेमिना मिस इंडिया 2024 निकिता पोरवाल : यानंतर या स्पर्धेत दादर नगर हवेलीची रेखा पांडे फर्स्ट रनर अप तर गुजरातची आयुषी ढोलकिया सेकंड रनर अप ठरली. फेमिना मिस इंडिया 2023ची विजेती नंदिनी गुप्तानं निकिताच्या डोक्यावर मुकुट सजवला. याशिवाय नेहा धुपियानं तिला मिस इंडिया सॅश घालून दिले. तसेच या कार्यक्रमात अभिनेत्री संगीता बिजलानीनं परफॉर्मन्ससह रॅम्प वॉक केला. फेमिना मिस इंडिया 2024च्या कार्यक्रमात राघव जुयाल आणि इतर अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर दिसले. दरम्यान निकिताबद्दल बोलायचं झालं तर तिनं आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन अँकर म्हणून केली होती.
निकिता पोरवालनं जिंकल्यानंतर केल्या भावना व्यक्त : निकिताला अभिनयाशिवाय लेखनाचीही आवड आहे. तिनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रंगमंच नाटकांसाठी लेखन केलंय. याशिवाय तिनं चित्रपटांमध्येही काम केलंय. तिचा आगामी चित्रपट 'चंबळ पार' आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. निकिताचे वडील अशोक पोरवाल यांनी निकिता ही स्पर्धा जिंकल्यानंतर सांगितलं, "ही आमच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या विजेतेपदासाठी निकिता अनेक वर्षांपासून मेहनत करत होती." तसेच मिस इंडिया झाल्यानंतर निकितानं सांगितलं, "फेमिना मिस इंडिया ब्यूटी कॉन्टेस्ट ही सर्वात जुनी सौंदर्य स्पर्धा आहे. गेल्या महिन्यात ही स्पर्धा सुरू झाली. यामध्ये मध्य प्रदेशातील सुमारे 200 मुली सहभागी झाल्या असून पहिली फेरी दिल्लीत पार पडली. यामध्ये माझी टॉप 5 मध्ये निवड झाली. यानंतर टॉप 5 ची दुसरी फेरी मुंबईत पार पडली, ज्यामध्ये एका राज्यातून एक स्पर्धक निवडायचा होता, त्यातही माझी निवड झाली. आता निकिता मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
हेही वाचा :