'टायगर 3' च्या ऑस्ट्रियातील शुटिंगमधून सलमान खान मायदेशी परतला - टायगर 3चे शुटिंग ओटापून सलमान परतला
सुपरस्टार सलमान खान ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आगामी अॅक्शन चित्रपट टायगर 3चे शुटिंग ओटापून मायदेशी परतला आहे. या शोचा प्रीमियर 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे पूर्वतयारीसाठी तो परतला आहे.

मुंबई - सुपरस्टार सलमान खान ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आगामी अॅक्शन चित्रपट टायगर 3चे शुटिंग ओटापून मायदेशी परतला आहे. विमानतळावर पोहोचतात च्याला कॅमेऱ्यात कैद करण्याची हौशी फोटोग्राफर्समध्ये चढाओढ पाहायला मिळाली. बिग बॉसच्या शुटिंगसाठी तो मुंबईला परतला आहे.
सलमान खान 'टायगर 3' च्या शुटिंगसाठी गेली काही आठवडे भारताबाहेर आहे. तुर्कीमधील शुटिंग ओटापून तो ऑस्ट्रियामध्ये दाखल झाला होता. कॅटरिना कैफसोबत काही धमाल अॅक्शन सीन्सचे शुटिंग त्याने येथे केले. त्यानंतर कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या शोचे गेली दशकभर तो होस्टिंग करीत आहे. या शोचा प्रीमियर 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे पूर्वतयारीसाठी तो परतला आहे.
बिग बॉस शोशी सलमानचे दीर्घ नाते
बिग बॉस शोशी त्याचे जुने नाते आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला होता की,"बिग बॉससोबत माझे नाते ... हे कदाचित माझे एकमेव नाते आहे जे इतके दिवस टिकले आहे. ते जाऊ द्या. (पण) बिग बॉसने माझ्या आयुष्यात एक निश्चित परमनन्सी आणली आहे. या चार महिन्याच्या काळात आम्ही एकमेकांना डोळ्यात डोळा घालून पाहात नसलो तरी सिझन संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येण्यासाठी हतबल असतो."
बिग बॉसचे नवे स्पर्धक
बिग बॉसच्या नवीन सिझनमध्ये जे स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यामध्ये अभिनेत्री शमिता शेट्टी आणि नृत्यदिग्दर्शक निशांत भट्ट यांचा समावेश आहे - जे अलीकडेच बिग बॉस ओटीटी, वूटवर थेट डिजिटल शोमध्ये दिसले होते. नवीन प्रवेश करणाऱ्यांमध्ये टीव्ही अभिनेता डोनल बिश्त आणि बिग बॉस 13 चा अंतिम विजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज यांचा समावेश आहे.