अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' होणार थियटरमध्ये रिलीज, तारखेची घोषणा - अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' चित्रपट
सुपरस्टार अक्षय कुमारने मंगळवारी जाहीर केले की त्याचा आगामी चित्रपट 'बेल बॉटम' येत्या २७ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहात दाखल होईल.
मुंबई - कोविड रुग्ण संख्येत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनवरील निर्बंध भारतातील बर्याच भागात कमी झाल्याने 'बेल बॉटम'च्या टीमने हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्राम अकाउंटवरुन अभिनेता अक्षय कुमारने मंगळवारी शेअर केले की 'बेल बॉटम' २७ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
“मला माहित आहे की तुम्ही 'बेल बॉटम'च्या प्रदर्शनाची धैर्याने वाट पाहात होतात. शेवटी आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करताना आनंद झाला आहे. जगभरातील मोठ्या पडद्यावर 'बेल बॉटम'चे २७ जुलै रोजी आगमन होई,'' असे त्याने लिहिलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'बेल बॉटम' हा चित्रपट यापूर्वी २ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. तथापि, कोरोनाव्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते.
रिलीजची तारीख निश्चित झाल्यानंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अनेकांनी अक्षयला शुभेच्छा देत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रणजित एम. तिवारी दिग्दर्शित बेल बॉटम या चित्रपटाची निर्मिती वशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा आडवाणी, मधु भोजवानी आणि निकिल आडवाणी यांनी केली असून यात वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता भूपती हे कलाकार आहेत.
हेही वाचा - ...आणि असा झाला ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’चा जन्म!