ETV Bharat / international

मॉडेर्ना कंपनीकडून अमेरिका आणखी १० कोटी कोरोना लसीचे डोस घेणार

author img

By

Published : Dec 12, 2020, 4:37 PM IST

अतिरिक्त १० कोटी डोसची ऑर्डर दिल्यामुळे जून २०२१ पर्यंत आणखी लस उपलब्ध असेल, तसेच लसीकरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येईल, असे अमेरिकेच्या आरोग्य सेवेच्या सचिवांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन डी. सी - बायोटेक कंपनी मॉडेर्नाकडून अमेरिका अतिरिक्त १० कोटी कोरोनाचे डोस विकत घेणार आहे. आधीच १० कोटी डोसची ऑर्डर दिली असल्यामुळे आता एकूण २० कोटी डोस मॉडेर्नाकडून अमेरिका घेणार आहे. कंपनीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

पुढील वर्षी जूनपर्यंत मिळणार लस

अमेरिका सरकारने सुरुवातीला दिलेल्या १० कोटी डोसच्या ऑर्डरपैकी २ कोटी डोस डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत देण्यात येतील. तर उर्वरित डोस २०२१ वर्षाच्या पहिल्या तिमाहिती सुपूर्द करण्यात येतील. तर आत्ता ऑर्डर केलेले अतिरिक्त १० कोटी लसीचे डोस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीती म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान मिळतील, असे कंपनीने अधिकृत वक्तव्य जारी केले आहे.

लसीकरण कार्यक्रमासाठी अमेरिकेची तयारी

अतिरिक्त १० कोटी डोसची ऑर्डर दिल्यामुळे जून २०२१ पर्यंत आणखी लस उपलब्ध असेल, तसेच लसीकरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येईल, असे अमेरिकेच्या आरोग्य सेवेच्या सचिवांनी सांगितले. २०२१ च्या मध्यापर्यंत गरज असलेल्या सर्वांना लस मिळावी यासाठी अतिरक्त लसीची ऑर्डर दिली असून त्यामुळे लसीकरण कार्यक्रम पुढे नेण्याचा विश्वास निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून आणीबाणीच्या काळात लसीला परवानगी मिळाल्यानंतर लसची पुरवठा करण्यात येईल, असे मॉडेर्ना कंपनीने म्हटले आहे. मॉडेर्ना कंपनीने तयार केलेल्या लसीचे नाव mRNA-1273 असे आहे. अमेरिका सरकारने लसीत विश्वास दाखविल्याबद्दल कंपनीने सरकारचे कौतुक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.