ETV Bharat / entertainment

चुंडी काऊंटर ते फुटबॉल सामना : आयरा खान नुपूरच्या लग्नाचा निराळा थाट-माट - आमिर खानची मुलगी आयरा खान

Ira Khan-Nupur Shikhare's wedding : आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे उदयपूरमधील लग्न सध्या खूप चर्चेत आहे. मेहंदी, संगीता यासोबतच वऱ्हाडी मंडळींसोबत नववधू आणि वराने फुटबल खेळण्याचा आनंदही घेतला. लग्नाच्या ठिकाणी थेट चुडी काउंटर आणि पायजमा पार्टीचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

Ira Khan-Nupur Shikhare's wedding
चुंडी काऊंटर ते फुटबॉल सामना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 4:38 PM IST

मुंबई - Ira Khan-Nupur Shikhare's wedding : सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान आणि जावई नुपूर शिखरे यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना उत्साहत सुरुवात झाली आहे. उदयपूरमध्ये पार पडत असलेल्या या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत. काल रात्री पायजमा पार्टीनंतर, जोडप्याने फुटबॉल सामन्यासह उत्सव पुन्हा सुरू केला तर पाहुण्यांसाठी लग्नाच्या ठिकाणी थेट चुडी काउंटर लावून वेगळा अनुभव दिला.

3 जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या अधिकृत विवाह सोहळ्यानंतर, या जोडप्यान कुटुंबियांसह उदयपूर गाठले होते. या ठिकाणी शाही विवाह सोहळा होत आहे. आयरा आणि नुपूरच्या डेस्टीनेशन वेडिंगमधील लेटेस्ट व्हिडिओंमध्ये एक फुटबॉल सामना सुरू असल्याचे दिसते. यामध्ये आयरा आणि नुपूरने त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत फुटबॉल खेळाचा आनंद लुटला.

लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये मजा आणि मस्तीने भरपूर पायजमा पार्टीमध्ये आमिर खान, किरण राव आणि इतरांचा समावेश होता. पाहुणे आणि प्रियजन यात आनंदात सामील झाले. आरामदायी पायजामा घालून सर्वजण गाणी आणि नृत्यात रमले होते. आयरा आणि नुपूर शिखरे यांनीही धमाल डान्स करुन पाहुण्यांना साथ दिली. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर झळकले आहेत. जोडप्याच्या एका जवळच्या मित्राने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजस्थानातील कारागीर पाहुण्यांसाठी राजस्थानच्या प्रसिद्ध लाखाच्या बांगड्या बनवताना दिसत आहेत.

मेहेंदी समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. यावेळी आयराने विचित्र सनग्लासेसने सजलेला पारंपारिक पांढरा पोशाख घातला होता, तिच्या दोन्ही हातांवर अतिशय सुंदर मेहंदी डिझाइन्स पाहायला मिळाले. नुपूर तिच्या पाठीशी राहून फोटोंसाठी पोझ देताना दिसला. या सोहळ्याच्या आनंदात भर घालताना आमिरची माजी पत्नी किरण रावने आपल्या सावत्र मुलीच्या लग्नात मनापासून गाणे गायले आणि उपस्थितांना नृत्याचा ताल धरायला भाग पाडले. यामुळे कार्यक्रमात रंगत आल्याचं चित्र पाहायला मिळाले.

Ira Khan-Nupur Shikhare's wedding
आयरा खान नुपूरच्या लग्नाचा निराळा थाट-माट

ताज अरावली रिसॉर्ट अँड स्पा येथे नियोजित होणारा आगामी संगीत सोहळा एक इनेक वैशिष्ट्ये असणारा रंगारंग सोहळा असणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य आणि धमाल उत्सवाची सूरमयी संध्याकाळ असेल अशी अपेक्षा आहे. 10 जानेवारीला शपथेची देवाणघेवाण करून विवाहसोहळा पूर्ण होईल. या सोहळ्यात तयार होणाऱ्या अनेक आनंददायी आठवणी आयरा आणि नुपूरसह पाहण्यांसाठीही संस्मरणीय ठरणार आहे.

Read More

  1. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर'चा ट्रेलर 'या' तारखेला होणार प्रदर्शित
  2. आमिर खानचा जावई नुपूर शिखरेनं केला लुंगी डान्स, पाहा व्हिडिओ
  3. फार्महाऊसवर घुसखोरीनंतर विमानतळावर कडक बंदोबस्तात दिसला सलमान खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.