ETV Bharat / entertainment

Chandrayaan 3 Landing : मिशन मून आणि अवकाशवर आधारित बॉलिवूड चित्रपट... - भारतीय चित्रपटसृष्टी

भारतीय चित्रपटसृष्टीत अवकाश आणि चंद्रावर अनेक चित्रपट बनले आहेत. या चित्रपटांनी लोकांना घरात बसून चंद्र आणि अवकाशाची सफर घडवली आहे. दरम्यान 'चंद्रयान - ३'चे मिशन पूर्ण होण्यासाठी काही तासच शिल्लक आहेत. त्याआधी आपण काही विशेष चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...

Chandrayaan 3
चंद्रयान ३
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 4:54 PM IST

मुंबई : भारताचे 'चंद्रयान-३' अवकाशात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. 'चंद्रयान-३'चे लँडर आज २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल. यापूर्वी चीन, अमेरिका आणि रशियाने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. परंतु आजपर्यंत कोणीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले नाही. चंद्रावर 'चंद्रयान ३' मोहिमेसाठी आता फक्त काही तास उरले आहेत. इस्रो हे विक्रम लँडरला सॉफ्ट लॅडिंग करून एक इतिहास रचणार आहे. आता देशासह संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या मिशन मूनकडे लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय सिनेजगतात असे काही चित्रपट बनले आहेत, जे अंतळावर आधारित आहेत.

चांद पर चढ़ाई : भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच अभिनेता दारा सिंग यांनी 'चांद पर चढ़ाई' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट १९६७ आला होता. या काल्पनिक चित्रपटाची निर्मिती टीपी सुंदरम यांनी केली होती. चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांची मोहीम पूर्ण होण्याच्या दोन वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्यात आला होता. हिंदी चित्रपटसृष्टीचा कदाचित हा पहिला विज्ञानकथा चित्रपट होता.

झिरो : शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा स्टारर चित्रपट 'झिरो' २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात किंग खान चंद्रावर चालताना दिसला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग नासामध्ये झाले आहे. याआधी शाहरुखने त्याच्या क्लासिक चित्रपट 'स्वदेश'चे शूटिंग देखील नासामध्ये केले होते.

कोई मिल गया : २००३ मध्ये, हृतिक रोशनने 'कोई मिल गया' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. चित्रपटाच्या कहाणीत एक व्यक्ती आपल्या संगणकाच्या सहाय्याने अवकाशात संपर्क साधते. त्यानंतर पृथ्वीवर एलियन येतात. हा चित्रपट हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता.

पीके : अवकाशाच्या दुनियेवर आधारित आमिर खान स्टारर 'पीके' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आमिर खानने या चित्रपटात एलियनची उत्तम भूमिका साकारली होती. या चित्रपटाची निर्मिती '३ इडियट्स' फेम दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केली होती. हा चित्रपट आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.

मिशन मंगल : अक्षय कुमार आणि विद्या बालन स्टारर चित्रपट 'मिशन मंगल' बऱ्याच चर्चेत होता. या चित्रपटाची निर्मिती जगन शक्तीने केली होती. हा चित्रपट भारतीय संशोधकांवर आधारित आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, शर्मन जोशी आणि कीर्ती कुल्हारी यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.

रॉकेट्री-नंबी इफेक्ट : २०२२मध्ये रिलीज झालेला 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता. आर. माधवनने भारतीय एरोस्पेस अभियंता नंबी नारायण भूमिका साकारली आहे. नंबी नारायण हे प्रतिभावान शास्त्रज्ञाचे नाव आहे, ज्यांनी भारताच्या अवकाश प्रकल्पाला मोठे यश मिळवून दिले होते.

हेही वाचा :

  1. Disha Parmar Vaidya : दिशा परमारने शेअर केला बेबी बंप फ्लॉंट करताचा फोटो...
  2. Chandrayaan 3: 'चंद्रयान-३' लँडिंगचा आनंद साजरा करत सेलिब्रिटींनी दिल्या इस्रोला शुभेच्छा...
  3. Jailer Box Office Collection Day 13 : रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट लवकरच ३०० कोटीच्या क्लबमध्ये करणार एंट्री...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.