ETV Bharat / city

Nahik CP letter bomb: पत्रावर मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आक्षेप, पोलीस आयुक्तांनी मागितली माफी - पोलीस आयुक्त दीपक पांडे माफी

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्रात महसूल विभागावर खळबळजनक आरोप केले आहेत. या पत्राची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दखल घेत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी पांडे यांनी देखील थोरात यांच्या नाराजीवर बिनशर्त माफी मागत दिलगिरी व्यक्त केली.

Balasaheb Thorat objection on deepak pande letter
पोलीस आयुक्त दीपक पांडे माफी
author img

By

Published : Apr 5, 2022, 11:15 AM IST

नाशिक - महसूल अधिकारी आरडीएक्स, तर दंडाधिकारी डिटोनेटर असून, यातून ते जिवंत बॉम्ब सर्वसामान्य नागरिकांसाठी बनवत आहे, असे आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्रात केले आहेत. या पत्राची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दखल घेत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी पांडे यांनी देखील थोरात यांच्या नाराजीवर बिनशर्त माफी मागत दिलगिरी व्यक्त केली.

हेही वाचा - Sambhajiraje Chatrapati meet Chagan Bhujbal : मी वंशज, पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – संभाजीराजे छत्रपती

नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे यांचा लेटर बॉम्ब प्रसिद्ध होताच महसूल विभागासह राज्यात खळबळ उडाली. या पत्रातील मजकुराची दखल घेत खुद्द महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यावर आक्षेप घेतला. पांडे यांच्यासारख्या आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या पत्रात एखाद्या विभागाबद्दल काही चुकीचे वाटत असल्यास त्याविषयी स्पष्टपणे मागणी करायला हवी होती. महसूल अधिकारांविषयी वापरलेली भाषा ही आक्षेपार्ह आहे, सर्वांना दोष देणे हे चुकीच आहे. कायद्याचे राज्य असताना अशा प्रकारे जबाबदार अधिकार्‍याने चुकीची भाषा वापरणे अयोग्य आहे. अशा प्रकारचे पत्र लिहून ते माध्यमांमार्फत प्रसिद्ध करणे ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे थोरात म्हणाले. त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ही बाब लक्षात आणून देणार असल्याचेही थोरात म्हणाले.

पत्रावर आयुक्त म्हणाले : मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आपण आदर करतो. ते आमचे आदर्श आहेत. महसूलमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल, तर मी त्यांची बिनशर्त माफी मागतो. माझ्या पत्राद्वारे मी कोणाचेही मन दुखवण्याचा, बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. माझ्या कार्यकाळात तपासात आलेल्या अनुभवानुसार या पत्रात उल्लेख केला आहे. माझ्यावर नियमभंग होण्यासारखी कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. मला आलेले अनुभव पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे पोहचवले आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हे पत्र दिले आहे. याबाबत ते योग्य ते निर्णय घेतील, अशी माझी अपेक्षा आहे. मी मात्र माझ्या पत्रावर ठाम आहे, असे पोलीस आयुक्त पांडे म्हणाले.

हेही वाचा - VIDEO : भरउन्हात पाण्यासाठी हरणांची भटकंती; ममदापूर वनक्षेत्रातील पाणवठे झाले कोरडेठाक

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.