नाशिक - प्रख्यात शिल्पकार मंदार गर्गे यांच्या सातपूर नजीकच्या बेळगाव ढगा येथील आर्ट स्टुडिओवर संशयीतांनी वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवून तसेच वॉचमनच्या बायकोला ठार मारण्याची धमकी देत दरोडा ( robbery in Mandar Garge art studio ) टाकला आहे.
प्रख्यात शिल्पकार मंदार गर्गे यांच्या सातपूर नजिकच्या बेळगाव ढगा येथील आर्ट स्टुडिओवर चोरट्यांनी दरोडा ( robbery in Craftsman Mandar Garge art studio ) टाकला आहे. वॉचमन व पत्नीस यांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत साडे आठ लाख रुपयांचे महापुरुषांच्या पुतळ्याचे ब्राँझ धातूचे भाग जबरीने चोरून नेले. स्टुडिओवर पाळत ठेवून तसेच किंमती ब्राँझ धातू चोरीसाठीच दरोड्याचा हा धाडसी प्रकार झाल्याचा संशय असून सातपूर पोलीस तपास करत आहेत.
वॉचमन पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून दिले जीवे मारण्याची धमकी -
दरोडेखोरांनी साडे आठ लाख रुपयांचे महापुरुषांच्या पुतळ्यांची ब्राँझ धातूचे भाग बळजबरीनं चोरून नेले आहेत. स्टुडिओ वर पाळत ठेवून तसेच किमती ब्राँझ धातू चोरी साठीच दरोड्याचा हा धाडसी प्रकार झाल्याचा संशय असून सातपूर पोलिस आता पुढील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहे.
लाखोंचे साहित्य दरोडेखोरांनी केले लंपास -
सातपूर नजीकच्या बेळगाव ढगा येथे शिल्पकार गर्गे यांचा स्टुडिओ आहे या स्टुडिओमध्ये देश-विदेशातील नामवंत शिल्पे घडवील जातात. या स्टुडिओचे वॉचमन जयदेव जाधव हे पत्नीसोबत येथे राहतात. मध्यरात्री ३ च्या सुमारास अनोळखी संशियितांनी मध्य रात्रीच्या वेळेस कारखान्यात प्रवेश करत जाधव यांना कोयत्याने धाक दाखवत पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करत लाखो रुपयांच्या वस्तूची चोरी केली आहे. कारखान्यात असलेल्या ब्रॉज धातूची चोरी करण्यात आली यावेळी कारखान्यात तयार होत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याच्या कमरेखाली प्रत्येकी साडे तीनशे किलो वजनाचे चार लाख वीस हजार रुपये किमतीचे ब्राँझचे दोन भाग, दीडशे किलो वजनाच्या ९० हजार रुपये किमतीची वीणा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कमरेखालील साडेचारशे किलो वजनाचा आणि २ लाख ७० हजार रुपये किमतीचा भाग, तसेच शंभर किलो वजनाच्या आणि ६० हजार रुपये किमतीची तलवार असा एकूण १४०० किलो वजनाचे आठ लाख ४० हजार रुपये किमतीचे ब्रांझ पळवण्यात आले आहे.
हेही वाचा - Gold Seized : शमशाबाद विनातळातून तब्बल 3.6 कोटीचे सोने जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल