ETV Bharat / city

वाढीव वीज बिल सरकारने भरावे, विदर्भावाद्यांची मागणी - ऊर्जामंत्री नितीन राऊत

गेल्या अनेक महिन्यांपासून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात वाढीव वीज बिलांच्या मुद्दयावर आंदोलन केले जात आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समिती
विदर्भ राज्य आंदोलन समिती
author img

By

Published : Jan 4, 2021, 3:27 PM IST

नागपूर - विदर्भातील जनतेला कोरोना काळात आलेले वाढीव वीज बिल सरकारने भरावे. तसेच यापुढील २०० युनिटपर्यंत वीज माफ करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौकात आंदोलन केलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात वाढीव वीज बिलांच्या मुद्दयावर आंदोलन केले जात आहे.

वाढीव वीज बिलाचा विषयाला धरून अनेक राजकिय पक्षांनी आंदोलन केले. मात्र त्यानंतर सर्वच पक्षांना या विषयाचा विसर पडला असला तरी विदर्भवादी संघटनांनी मात्र हा मुद्दा अद्यापही सोडलेला नाही. आजच्या आंदोलनात माजी आमदार वामनराव चटप आणि विदर्भवादी नेते राम नेवले उपस्थित होते.

२०० युनिट वीज निशुल्क द्यावे-

लॉकडाऊनच्या काळात आलेले वीज बिल माफ करावे. २०० युनिट वीज निशुल्क द्यावे, या मागणीसह वीज दर निम्मे करा, शेती पंपाला वीज बिलातून मुक्त करा, विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये प्रती हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले आहे.

ऊर्जामंत्र्यांच्या घराला घराव-


संविधान चौकात आंदोलन केल्यानंतर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. या करिता विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास दिला होता नकार-

लॉकडाऊनच्या काळात सरसकट विजेची बिले पाठवून आगोदरच आर्थिक मार सहन करणाऱ्या ग्राहकांना वीज नियामक मंडळाकडून दिलासा न मिळाल्याने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबईतील मुलुंड परिसरातील व्यापारी रवींद्र देसाई यांनी दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

हेही वाचा- बाळासाहेब थोरात देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा? मंत्री देशमुखांच्या नावाची चर्चा

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.