ETV Bharat / city

'तेव्हा ते लॉकडाऊनमध्ये सामील झाले आणि थाळ्या पिटण्याचा ''आनंद''ही घेतला'

मुख्यमंत्र्यांनी वारंवार हात धुवा, सॅनिटायझर, मास्क वापरा, असे आवाहन केले. मात्र विरोधकांनी यात राजकारण केले. यावर काय उपाययोजना, असा सवाल त्यांनी सामनातून केला आहे.

shivsena leader sanjay raut
shivsena leader sanjay raut
author img

By

Published : Apr 4, 2021, 9:55 AM IST

मुंबई - उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत ते सामील झाले होते. थाळ्या पिटण्याचा आनंदही त्यांनी साजरा केला होता, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनातून लगावला आहे.

हेही वाचा - शरद पवार, अमित शाह गुप्त भेटीमागचे रहस्य शिवसेनेने उलगडले, भाजपला मात्र गुप्त आजार

'विरोधकांकडून केवळ राजकारण'

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विविध जिल्ह्यांत नियमावली जाहीर करण्यात आली असून स्थानिक स्तरावर निर्बंध लावण्यात आले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह करून राज्यातील नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले होते. तसेच २ दिवसांत लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते, त्या पार्श्वभूमीवर विविध स्तरातून लॉकडाऊनला विरोध होत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी वारंवार हात धुवा, सॅनिटायझर, मास्क वापरा, असे आवाहन केले. मात्र विरोधकांनी यात राजकारण केले. यावर काय उपाययोजना, असा सवाल त्यांनी सामनातून केला आहे.

हेही वाचा - केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे; हे देशासाठी घातक!

'नवेच महाभारत'

लॉकडाऊन हा सर्वांशी चर्चा करूनच लावला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र यात राजकारण सुरू झाले. यावरूनच सामनातून टीका करण्यात आली आहे. 'मागील वर्षी पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर जे घडले ते धक्कादायक आणि अमानुष होते. लॉकडाऊनची घोषणा करताच देशात हाहाकार माजला. स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे पलायन हिंदुस्थानने याच काळात पाहिले. देशभरात लोक अडकून पडले. हजार किलोमीटरचा प्रवास केला. यादरम्यान अनेकांनी प्राण सोडले. कमाईचे साधन बुडाले. रोजगार संपला. पण भीतीने त्या सगळ्यांना घरात कोंडून ठेवले. त्या भीतीची भिंत आता फुटली आहे. ती बांधता येणे कठीण आहे. महाभारताची लढाई १८ दिवस चालली, मला २१ दिवस द्या, असे मोदी म्हणाले. आज वर्षभरानंतरही कोरोनाची लढाई आणि लॉकडाऊनची भीती कायम आहे. कोरोना हरणार नाही. ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी सरकारने शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे हे नवेच महाभारत सुरू झाले,' अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.