मुंबई मुंबईमध्ये एकिकडे कोरोना corona रुग्णांची संख्या वाढत असतानाच,पावसाळी आजारांनी rainy diseases देखील डोक वर काढलं आहे. महापालिकेने मलेरिया आणि डेंग्यूचा फैलाव Spread of Malaria and Dengue करणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट न करणाऱ्या ८,४३७ जणांना नोटीस बजावली आहे.तर,५९४ जणांविरोधात न्यायालयीन कारवाई सुरु करण्यात आली आहे.समज देऊनही दुर्लक्ष करणाऱ्यांकडून ९ लाख २२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या किटकनाशक विभागाचे प्रमुख राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली.मलेरियाचा फैलाव करणाऱ्या एनोफिलीस Anopheles डासांची ७,४८४ उत्पत्ती स्थाने आढळून आली.तर डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या एडिस aedes डासांची ४७,९३१ उत्पत्ती स्थाने आढळून आली.
यांना बजावली जाते नोटीस पावसाळ्यात उद्भवणारे आजार मलेरिया,लेप्टो,डेंग्यू,स्वाईन फ्ल्यूचा प्रसार झपाट्याने होत असतो.अशावेळी डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन call for caution पालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येते. मात्र अनेक मुंबईकर बेफिकिर असल्याने डासांची उत्पत्ती होते.आव्हान करुनही दुर्लक्ष करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येते असे नारिंग्रेकर यांनी सांगितले.
अशी घ्या काळजी how to be protected from dengue malaria पाण्याच्या टाकीचे झाकण तुटले असल्यास नीट बसवा.घर,सोसायटी,गॅरेजजवळ खड्डा पडून पाणी साचत असल्यास माती टाकून तो बुजवावा.कचऱ्याचे ढीग साचू देऊ नयेत.वेळोवेळी किटकनाशके फवारणी करावी.
हेही वाचा Tomato Flu भारतातील 82 मुलांना टोमॅटो फ्लूची लागण, बाल केंद्राने राज्यांना दिला सल्ला