गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक? आत्तापर्यंतचे सर्व ट्विट झाले डिलीट - कोल्हापूर लेटेस्ट न्यूज
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या बाबत भारतातील ट्विटर कार्यालयाला कळवण्यात आले आहे.
कोल्हापूर - गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत मुंबई सायबर सेलकडे तक्रारही करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. सतेज पाटील यांच्या ट्विटरवरील सर्व ट्विट डिलीट झाले आहेत. शिवाय त्यांचा डीपी सुद्धा दिसत नाही. मात्र, त्यांच्या अकाउंट वरून कोणताही चुकीचा मेसेज किंवा ट्विट करण्यात आले नाही, त्यामुळे नेमका काय प्रकार झालाय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यामुळे अकाउंट हॅक झाले असल्याची शक्यता असून नेमका काय प्रकार झाला आहे, हे मात्र तपासानंतर समोर येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ट्विटरच्या भारतातील कार्यालयाला सुद्धा याबाबत कळवण्यात आले असल्याचे समजले आहे. दरम्यान, सतेज पाटील यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना दिली नाही आहे.