कोल्हापुरात आघाडीची मुसंडी ; पाच जागांवर आघाडी पाहा काय म्हणतात कोल्हापुरातील पत्रकार - कोल्हापूरात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या ५ जांगा
कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा ५ जागांवर विजय झाला आहे. या निकालावर कोल्हापूर मधील पत्रकारांनी प्रतिक्रीया दिल्या.
कोल्हापूर- आघाडीला मोठे यश मिळताना पाहायला मिळत आहे. जवळपास पाच जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असून भाजप सेनेला मोठा फटका बसताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गतवेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सेनेला 8 जागा मिळाल्या होत्या पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळी साडे अकरा पर्यंत तरी काँग्रेस राष्ट्रवादी सद्या 5 जागांवर मोठी आघाडी घेताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील तर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. यासंदर्भात कोल्हापुरातील पत्रकारांशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
Body:.
Conclusion:.