ETV Bharat / city

धक्कादायक; निजामाचा वंशज सांगून विकली परस्पर जमीन, भामट्याने शिक्षकाला लावला 25 लाखाला चुना

author img

By

Published : Jun 22, 2021, 5:48 PM IST

निजामाचा वंशज असल्याची थाप मारुन भामट्याने फळ संशोधन केंद्राची जमीन शिक्षकाला परस्पर विकली. मात्र आपल्याला विकलेली जमीन निजामाची नसून फळ संशोधन केंद्राची असल्याचे उघड होताच शिक्षकाने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले. बेगमपुरा पोलिसांनी निजामाचा वंशज असल्याची भामटेगिरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Aurangabad
निजामाचा वंशज सांगणारा दिलशाद जहा ईमदाद जहा

औरंगाबाद - निजामाचा वंशज असल्याची थाप मारुन मूळ हैदराबाद येथील असलेल्या भामट्याने शिक्षकाला २५ लाखाला चुना लावल्याने शहरात खळबळ उडाली. या भामट्याने फळ संशोधन केंद्राची जमीनच निजामाची असल्याची थाप मारुन शिक्षकाला परस्पर विकली. दिलशाद जहा ईमदाद जहा असे निजामाचा वंशज असल्याची बनवाबनवी करणाऱ्या त्या भामट्याचे नाव आहे. बेगमपुरा पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

हैदराबादेतील नातेवाईकाच्या माध्यमातून अशी झाली ओळख

मूळ हैदराबादेतील अलकापूर येथे राहणारा दिलशाद जहा ईमदाद जहा आता हडको कॉर्नरला राहत आहे. त्याची शिक्षक मोहम्मद नदीम सलीम पाशा (वय ४६, रा. भडकल गेट) या शिक्षकाची ओळख हैदराबादच्या नातेवाईकाच्या माध्यमातून झाली होती. यावेळी त्याने आपण निजामाचे वंशज असल्याची थाप शिक्षक नदीम यांना मारली होती.

असा घातला २५ लाखाला गंडा, दिले राष्ट्रपतीला पाठवलेले कागदपत्र . . .

दिलशाद जहा याने हिमायतबाग येथे आपल्या मालकीची चारशे एकर जमीन आहे. त्याच्यावर जमीर पटेल नावाच्या व्यक्तीने कब्जा केला असल्याचे मोहम्मद नदीम सलीम पाशा यांना सांगितले. या जमिनीविषयी मालकीचे कागदपत्र पाशा यांना त्याने पाठवले. पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये जमीन मालकीविषयी राष्ट्रपती व गृहसचिव यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे कागदपत्रांचा समावेश होता. यानंतर दिलशानने वेळोवेळी अडचणी सांगून नदीम यांच्याकडून पैसे घेतले. सुरुवातीला त्याने 10 लाख रुपये घेतले होते. यावेळी हिमायत बाग येथील एक एकर जमीन २५ लाखाला देतो, असे त्याने शिक्षकाला सांगितले होते.

फसवणूक लक्षात येताच दिली तक्रार . .

नदीम पाशा यांनी दिलशानला निजामाचा वारसदार असल्याबाबत कागदपत्रे मागितली होती. मात्र त्याने ती त्यावेळी दिली नाही. त्यामुळे पाशा यांनी जमिनीबाबत अधिक माहिती केल्यावर ही जमीन सर्वे नंबर 104 फळ संशोधन केंद्राची असल्याचे उघड झाले. यावेळी पाशा यांनी दिलशानला संपर्क केला. मात्र त्यांना सुपारी किलरच्या माध्यमातून ठार करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दिलशान विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फळ संशोधन केंद्राची जमीनच परस्पर विकली

हिमायत बाग येथे असलेली निजामाची जमीन देण्याची थाप दिलशानने नदीम पाशा यांना मारली होती. या जमिनीच्या एक एकरासाठी २५ लाख रुपयेही घेतले होते. मात्र त्याने निजामाची सांगून फळ संशोधन केंद्राची जमीन परस्पर विक्री केली. या शिक्षकाला 25 लाखाला गंडवल्यांनतर ही बाब उघड झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.