औरंगाबाद - कोरोनामुळे सुरू केलेल्या लॉकडाऊनमध्ये महिला अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून घरातील सर्व सदस्या घरी असल्याने महिला अत्याचाराच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या असल्या तरी याबाबत पोलीस तक्रार करण्याचे प्रमाण मात्र खूप नगण्य असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे
कोरोनाच्या काळात नुकतेच लग्न झालेल्या विवाहित जोडप्यांमध्ये अनेक गैरसमज झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. येणाऱ्या तक्रारींमध्ये 60 टक्के तक्रारी महिलांच्या असल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी व्यक्त केले.
लॉकडाऊन हा कोरोनामुळे सुरू केला असला तरी त्यामुळे आजाराला आळा बसला आहे की नाही, हे जरी समजत नसले, तरीही या काळात महिला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये घरगुती हिंसा वाढली आहे. मारहाण करण्यापेक्षा शिवीगाळ करण्याच्या आणि शाब्दिक छळाच्या घटना वाढल्या असल्याच्या घटना वाढल्या असल्याचे मत महिला अभ्यासक मंगल खिवंसरा यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - कांगारु, माकडे, कासव अन् पोपटांची तस्करांच्या तावडीतून सुटका; परदेशातून भारतात तस्करी
अनेक महिला वर्कफ्रॉम होम करत आहेत. मात्र घरातील सर्व लोक घरी असताना काम करणे आणि कुटुंबातील सर्व लोकांच्या इच्छा पुरवणे एकाचवेळी शक्य होत नाही. त्यामुळे वाद आणि भांडण झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर पुरूष घरात असल्याने अनेकवेळा स्त्रीकडे म्हणजेच पत्नीकडे शरीर सुखची केलेली मागणी पूर्ण न झाल्याने देखील वाद आणि भांडणे झाल्याचे पाहायला मिळाले.
काही घटनांमध्ये तर पती पत्नी विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत पोहचल्याच्या तक्रारी समोर आल्या असल्याचे दिसून येत आहे, असे मनोसपचार तज्ञ डॉ संदीप शिसोदे यांनी सांगितलं. घर काम करणाऱ्या महिला ज्यामध्ये आपल्या घरी काम करणाऱ्या मोलकरीण, बाहेरील आणि घरचे काम करणाऱ्या महिला आणि गृहिणी असणाऱ्या महिला यांच्यावरील ताण तणाव वाढला आहे. यामध्ये कुटुंबांमधील भांडण वाढली आहे. जे काही काम करायचे ते स्त्रीनेच करावे, अशी भावना अनेक कुटुंबात असल्याने महिलेची मानसिक कोंडी होत असून ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
सतत होणारा हिंसाचार आणि पोलिसात होणाऱ्या तक्रारी यात मोठी तफावत आहे. बहुतांश महिलांनी अद्याप पोलीस तक्रार केलेली नाही. मात्र, कोरोनाची संकट कमी झाले की, या तक्रारी मोठ्या प्रमाणात बाहेर येण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, असं मत महिला अभ्यासक मंगल खिवंसरा यांनी व्यक्त केले.