अमरावतीत ATS ची मोठी कारवाई; मासोद येथे १२०० जिलेटिन कांड्या जप्त; १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत - एटीएसची अमरातीत मोठी कारवाई
दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ने फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मासोद येथे १२०० ते १५०० जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. स्फोटक पदार्थांचा हा साठा तीन वाहनांमध्ये भरून ठेवला होता.
अमरावती - दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ने फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मासोद येथे १२०० ते १५०० जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. स्फोटक पदार्थांचा हा साठा तीन वाहनांमध्ये भरून ठेवला होता. पथकाने सोमवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली. या प्रकरणीची कसून चौकशी सुरू आहे.
ही वाहने पोलीस आयुक्तालय परिसरातील जोग स्टेडियममध्ये ठेवण्यात आली आहेत. जिलेटिन कांड्यांची ही खेप अकोल्यावरून आली आहे. विहीर व खदानाकरिता सदर जिलेटिनचा वापर करण्यात येतो. मात्र, हे जिलेटिन कुठून आणण्यात आले, ते अधिकृत आहेत काय, हा साठा कुणाच्या मालकीचा, याची चौकशी एटीएसचे अधिकारी करीत आहेत. याप्रकरणी तीन वाहनचालकांना पथकाने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. यात तबल १० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.