ETV Bharat / business

कोरोनाची लस नागरिकांना देण्याच्या प्रयत्नात ‘या’ देशाची आघाडी

author img

By

Published : Aug 7, 2020, 6:19 PM IST

स्वित्झर्लंडच्या सार्वजनिक आरोग्याच्या संघराज्य कार्यालयाने लसीच्या कराराची माहिती दिली. करारामुळे देशाला मॉर्डना कंपनीची लस लवकर मिळणार असल्याची हमी आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले. जगामध्ये पहिल्यांदाच कोरोनाच्या लसीसाठी खासगी कंपनीने एखाद्या देशाच्या सरकारबरोबर करार केला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

जीनिव्हा – जगभरात कोरोनाची लस मिळविण्यासाठी विविध देशांच्या सरकारची स्पर्धा सुरू आहे. अशातच स्वित्झर्लंड सरकारने मॉर्डना कंपनीबरोबर कोरोनाच्या लसींचे 4.5 दशलक्ष डोस घेण्यासाठी करार केला आहे. ही कोरोनाची लस अमेरिकेची जैविक तंत्रज्ञान कंपनीने विकसित केली आहे.

स्विस नागरिकांना वेगाने आणि सुरक्षित अशी कोरोनाची लस मिळावी, अशी संघराज्य सरकारची इच्छा आहे. त्याचबरोबर संघराज्य सरकारकडून भविष्यात कोरोनाच्या लसींचे योग्य वितरण होण्यासाठी बहुस्तरीय प्रकल्पाला मदत करण्यात येत असल्याचे स्विस सरकारने म्हटले आहे.

कोरोनाच्या लसीसाठी सुमारे 330 दशलक्ष डॉलरची तरतूद

मॉर्डना लसींचे प्रत्येकी दोन डोस हे 2.25 दशलक्ष नागरिकांना देण्यात येणार आहेत. स्विसत्झर्लंड सरकारकडून इतर कंपन्यांबरोबरही कोरोनाच्या लसींसाठी चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या लसीसाठी सरकारने सुमारे 330 दशलक्ष डॉलरची तरतूद केली आहे. मात्र, मॉर्डना कंपनीबरोबर किती कोटींचा करार झाला, हे स्विस सरकारने जाहीर केले नाही.

मॉर्डना लस ही लोकांची प्रतिकारक्षमता वाढवते हे प्रायोगिक चाचण्यांमधून दिसून आले. दरम्यान, कोरोनाची प्रभावी व सुरक्षित लस कोणाला मिळावी, यावर जगभरात वादविवाद सुरू आहेत. अशातच स्विस सरकारने सर्वात आधी नागरिकांसाठी लस उपलब्ध मिळवून देण्यासाठी पाऊल उचलले आहे.

दरम्यान, स्वित्झर्लंड हा देश वार्षिक दरडोई उत्पन्नात आघाडीवर असलेला देश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.