फलंदाजांच्या नेट प्रॅक्टिससाठी 'हे' चार गोलंदाज जाणार इंग्लंडला - खलील अहमद, अवेश खान, दीपक चाहर आणि नवदीप सैनी
बीसीसीआयने यापूर्वीही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नेट प्रॅक्टिससाठी अवेश खान आणि मोहम्मद सिराज यांना पाठविले होते.

मुंबई - इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यांमध्ये वेगवान गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या खांद्यावर आहे. बीसीसीआयने या मुख्य गोलंदाजांवर जास्त भर पडू नये म्हणून फलंदाजांच्या सरावासाठी चार अतिरिक्त गोलंदाजांची निवड केली आहे. हे चार गोलंदाज भारतीय संघासोबत इंग्लंडला जातील.
या चार गोलंदाजांमध्ये खलील अहमद, अवेश खान, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. हे गोलंदाज भारतीय संघास नेट्समध्ये मदत करतील. सध्या हे गोलंदाज आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. तसेच मुख्य गोलंदाज जखमी झाले तर त्याला पर्याय म्हणून वरील चार गोलंदाजांपैकी एकास संधी मिळू शकते.
बीसीसीआयने यापूर्वीही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नेट प्रॅक्टिससाठी अवेश खान आणि मोहम्मद सिराज यांना पाठविले होते. त्यानंतर दुबई येथे झालेल्या आशिया चषकासाठी फलंदाजाच्या सरावासाठी डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा शाहबाज नदीम आणि लेग स्पिनर मयंक मार्कंडे यांच्यासोबत एम. प्रसिद्ध कृष्णा आणि सिद्धार्थ कौल यांना पाठविले होते.
SPO 01
Conclusion: