ETV Bharat / bharat

Lord Jagannath Ratha Yatra : भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला आजपासून सुरुवात - भगवान जगन्नाथ रथयात्रा इतिहास

ओडिशातील प्रसिद्ध अशा पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली ( Ratha Yatra 2022 ) आहे. रथयात्रेच्या सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो भाविक पुरी येथे दाखल झाले आहेत.

Lord Jagannath Ratha Yatra
भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला आजपासून सुरुवात
author img

By

Published : Jul 1, 2022, 7:54 AM IST

पुरी ( ओडिशा ) : पुरी - ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांची रथयात्रा महोत्सवाला सुरुवात झाली ( Ratha Yatra 2022 ) आहे. जवळपास आठवडाभर जगन्नाथ यात्रेचा महोत्सव असतो. महोत्सवासाठी देश-विदेशातून लाखो भाविक हजेरी लावतात. भगवान श्रीकृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या पूजेनंतर जगात प्रसिद्ध असलेली रथयात्रा काढण्यात येते. दोन वर्षांच्या खंडानंतर भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या नऊ दिवसांच्या रथयात्रेला आजपासून पूर्ण लोकसहभागाने सुरुवात झाली आहे.

३ वेगवेगळे रथ : आज जगन्नाथ रथ यात्रेचा पहिला दिवस आहे. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भक्त भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे ३ वेगवेगळे रथ ओढतात. भाविक जवळपास ३ किलोमीटर लांब असलेल्या गुंडीचा मंदिरापर्यंत रथ ओढतात. कोविड-19 साथीच्या आजारामुळे, 2020 आणि 2021 मध्ये उत्सवादरम्यान भाविकांना पवित्र नगरात प्रवेश नाकारण्यात आला होता.

असा असतो उत्सव : ओडिशा राज्यात श्री जगन्नाथांचे जगप्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर पुरी शहरात समुद्रकिनारी बांधलेले आहे. भगवान जगन्नाथाच्या (जगाचा स्वामी) मंदिर चारधाम मंदिरांपैकी एक आहे. मंदिर वैष्णव सांप्रदायाचे असून भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. जगन्नाथांचे वास्तव्य असल्याने या गावाला 'जगन्नाथपूरी' असेही नाव आहे. मंदिरातून निघणारी वार्षिक रथ यात्रा जगप्रसिद्ध आहे. मंदिरातील मुख्य ३ देवता भगवान जगन्नाथ, जगन्नाथाचे मोठे भाऊ बलभद्र (बलराम) आणि बहिण सुभद्रा यांची वेगवेगळ्या सजवलेल्या रथांमध्ये यात्रा काढली जाते.

हेही वाचा : ओडिशा: स्वप्नात झाला दृष्टांत.. घरामध्ये खोदकाम केले अन् सापडल्या १४ प्राचीन मूर्ती..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.