ETV Bharat / bharat

BSF Killed Two Pakistani Infiltrators : घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी घुसखोरांचा बीएसएफच्या जवानांनी केला खात्मा - सीमा सुरक्षा दल

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा केला आहे. या पाकिस्तानी घुसखोरांनी सोमवारी रात्री भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला होता.

BSF Killed Two Pakistani Infiltrators
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 2, 2023, 12:11 PM IST

बारमेर : भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या दोन घुसखोरांचा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला. ही घटना राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील बारमेरवाला चेक पोस्टजवळ सोमवारी रात्री उशीरा घडली. सीमा सुरक्षा दलांच्या जवानांनी इशारा दिल्यानंतरही या घुसखोरांनी जवानांना जुमानले नाही. त्यामुळे जवानांनी या घुसखोरांचा खात्मा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोमवारी रात्री सुरू होता घुसखोरीचा प्रयत्न : सीमा सुरक्षा दलाचे जवान बारमेरवाला चेक पोस्टवर सोमवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी रात्रीच्या अंधारात पाकिस्तानच्या बाजुने भारतीय सीमेत घुसखोरी होत असल्याचे जवानांना दिसून आले. या घुसखोरांना भारतीय सीमेत घुसखोरी करताना पाहिल्याने भारतीय जवानांनी त्यांना इशारा दिला होता. मात्र तरीही या घुसखोरांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करुन या घुसखोरांचा खात्मा केला.

ड्रग्जची करत होते तस्करी : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केलेल्या पाकिस्तानी घुसखोरांकडे ड्रग्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय जवानांनी दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा केल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर उच्चाधिकाऱ्यांनी भेट दिली. या दोन्ही घुसखोरांकडे ड्रग्ज असल्याचे समोर आले असले, तरी याबाबत अद्यापही अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन घुसखोरांना ठार केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सत्येंद्र पाल सिंह यांनी दिली.

श्रीगंगानगरमध्ये एक घुसखोर ठार : राजस्थानमधील बारमेर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन घुसखोरांना ठार केले आहे. मात्र राजस्थानमध्ये घुसखोरी करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या डिसेंबरमध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले होते. घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता. श्रीकरणपूरजवळील हरमुख पोस्टवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून माचिस, सिगारेट, पाकिस्तानी चलन आणि दोरी जप्त करण्यात आली होती.

हेही वाचा - Gangster Tillu Killed In Tihar Jail : दिल्लीच्या तिहार कारागृहात पुन्हा गँगवार; कुख्यात गँगस्टर टिल्लू गोळीबारात ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.