ETV Bharat / bharat

तामिळनाडूत कोरोनाग्रस्तांचा आकडा 911 वर; आज नव्याने 47 रुग्ण आढळले

author img

By

Published : Apr 11, 2020, 7:42 PM IST

राज्यात 44 जण उपचारानंतर बरे झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

file pic
कोरोना संग्रहित छायाचित्र

चेन्नई - तामिळनाडू राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 911 वर पोहचला आहे. आज (शनिवार0 दिवसभरात राज्यात 47 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 881 जण दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाशी संबंधित आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  • Number of COVID19 positive cases who attended 'single source' event at Delhi and their contacts today is 47. Total number of positive cases in those who attended 'single source' event at Delhi and their contacts till today is 881: Tamil Nadu Health Department

    — ANI (@ANI) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

44 जण उपचारानंतर बरे झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत कोरोनाचा फैलाव कमी होता. मात्र, दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमाला राज्यातील दीड हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. ते माघारी राज्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढाली. आजही नव्याने सापडलेले 47 रुग्ण दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाशी संबधीत आहेत.

देशामध्ये आत्तापर्यंत 7 हजार 447 रुग्ण आढळून आले आहेत. तर 642 जण पूर्णत बरे झाले आहेत. मागील 24 तासात देशात 1 हजार 35 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 239 रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती आरोगय मंत्रालयाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.