ETV Bharat / bharat

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ; 'आयएनएस कवरत्ती' घेणार शत्रूचा अचूक ठाव

भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम.नरवणे यांनी आज विशाखापट्टनमध्ये 'आयएनएस कवरत्ती' ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली. प्रकल्प 28अंतर्गत चार स्टील्थ युद्धनौका तयार करण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या तीन नौका या भारतीय नौदल सेवेत आहेत.

आयएनएस कवरत्ती
आयएनएस कवरत्ती
author img

By

Published : Oct 22, 2020, 1:35 PM IST

नवी दिल्ली - सध्या भारत आणि चीनदरम्यान तणाव असून दोन्ही देशांकडून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताने आपली लष्कर क्षमता वाढवण्यावर जोर दिला आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी आज विशाखापट्टणममध्ये 'आयएनएस कवरत्ती' ही युद्धनौकेला भारतीय नौदलात सामील केले. या युद्धनौकेमुळे नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ झाली आहे.

'आयएनएस कवरत्ती' ही युद्धनौका प्रकल्प 28 अंतर्गत तयार करण्यात आली आहे. ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्र प्रणालीयुक्त असून दूरवरील लक्ष्य साधू शकते. तसेच युद्धनौकेत सेल्फ डिफेन्स कार्यप्रणाली आहे. यात वापरण्यात आलेली यंत्रणा 90 टक्के पूर्णपणे भारतीय आहे. संपूर्ण परीक्षण आणि चाचण्या करण्यात आल्यानंतर आज ही युद्धनौक नौदलाला सुपूर्द करण्यात आली. पाणबुडीच्या ठिकाणाचा ठाव घेण्यासाठी युद्धनौकेत सेंसर आहेत. तसेच ही रडारवरही दिसत नाही.

प्रकल्प 28 अंतर्गत चार स्टील्थ युद्धनौका तयार करण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या तीन नौका या भारतीय नौदल सेवेत आहेत. या श्रेणीतली ही चौथी युद्धनौका आहे. या युद्धनौकेची रचना भारतीय नौदलाच्या 'नौदल डिझआईन महानिदेशालय'ने (डीएनडी) केली आहे.

'आयएनएस कवरत्ती' हे नाव, 1971मध्ये पाकिस्तानच्या गुलामीतून बांगलादेशाला मुक्त करणाऱ्या युद्धात मुख्य भूमिका निभावणाऱ्या मिसाईलयुक्त युद्धनौकेच्या नावावरून देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.