नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना 'आप'चे संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी ( Delhi liquor policy case ) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयानं ईडीला दिली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयानं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मनी लाँड्रिंगमधील कथित सहभागासाठी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) खटला चालवण्यासाठी ईडीला परवानगी दिली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, ईडीनं दिल्लीच्या नायब राज्यपालांना पत्र लिहित केजरीवाल हे कथित दारू घोटाळ्यातील 'मुख्य सूत्रधार' असल्याचं म्हटलं होतं. ईडीच्या पत्रानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल विजय कुमार सक्सेना यांनी केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यासह इतरांविरुद्ध ईडीनं दाखल केलेलं आरोपपत्र बेकायदेशीर असल्याच म्हटलं होते. तेव्हापासून अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालविण्याची प्रक्रिया न्यायालयीन खटल्यांमुळे प्रलंबित राहिली होती.
आज मैं अपना नामांकन भरने जा रहा हूँ।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 15, 2025
पूरी दिल्ली से मेरी कई माँ बहनें मुझे आशीर्वाद देने मेरे साथ जाएँगी।
नामांकन के पहले प्रभु का आशीर्वाद लेने बाल्मीकि मंदिर और हनुमान मंदिर जाऊँगा।
- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज विधानसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " आज मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. संपूर्ण दिल्लीतील माझ्या अनेक माता-भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासोबत येणार आहेत. नामांकन करण्यापूर्वी, मी ईश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी वाल्मिकी मंदिर आणि हनुमान मंदिरात जाणार आहे".
दिल्लीत तापले राजकीय वातावरण: मंगळवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, काँग्रेसच्या नेते अलका लांबा आणि सोमनाथ भारती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवित आहेत. इंडिया आघाडीतील या घटक पक्षांतील नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपदेखील करण्यात आले आहेत. आपकडून लोकांना क्षमतेनुसार देणगी देण्याचं आवाहन करण्यात आलं. आपचे खासदार संजय सिंह यांनी त्यांच्या पगारातून एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीचा प्रचार करत आहेत. ऐन निवडणकुीच्या प्रचाराच्या काळात अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालू झाल्यास 'आप' पुढे पुढे राजकीय संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
हेही वाचा-