ETV Bharat / bharat

मध्य-प्रदेशात भीषण अपघात; सहा ठार, २४ जखमी

सोमवारी रात्री या पिकअपमधून काही मजूर जात होते. गाडीचे चाक पंक्चर झाल्यामुळे, पिकअप रस्त्याच्या कडेला उभी केली होती. यावेळी सर्व मजूर आतच बसून होते. काही वेळाने मागून येणाऱ्या भरधाव टँकरने पिकअपला जोरदार धडक दिली. यात चार मजूरांचा जागीच मृत्यू झाला..

Accident in MP Dhar district 6 dead as tanker hit pickup van
मध्य-प्रदेशात भीषण अपघात; सहा ठार, २४ जखमी
author img

By

Published : Oct 6, 2020, 8:03 AM IST

भोपाळ : मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यामध्ये रात्री उशीरा भीषण अपघात झाला. एका पिकअप व्हॅनला टँकरने जोरदार धडक दिल्याने, पिकअपमधील सहा मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर, २४ मजूर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री या पिकअपमधून काही मजूर जात होते. गाडीचे चाक पंक्चर झाल्यामुळे, पिकअप रस्त्याच्या कडेला उभी केली होती. यावेळी सर्व मजूर आतच बसून होते. काही वेळाने मागून येणाऱ्या भरधाव टँकरने पिकअपला जोरदार धडक दिली. यात चार मजूरांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य मजूर जखमी झाले. यानंतर तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान आणखी दोन मजूरांचा मृत्यू झाला.

हे सर्व मजूर धार जिल्ह्यातील टांडा गावचे रहिवासी असल्याचे समजत आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. सर्व मृतांचे मृतदेह देखील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तसेच, दुर्घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.