VIDEO : भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयासमोरील झाडावर युवकाचं आंदोलन - YOUTH PROTEST ON TREE
Published : Jan 24, 2025, 9:36 PM IST
मुंबई : आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत एका तरुणानं थेट मुंबईतील मंत्रालयासमोरील झाडावर चढून आंदोलन केले. ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेविकेविरोधात कारवाई करण्याची मागणी या तरुणाने केली. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाला झाडावरुन खाली उतरवले.
पोलिसांच्या व अग्निशमन दलाच्या जवानांच्या समजावणीनंतर हा तरुण खाली उतरला. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्याला पोलिस व्हॅनमधून पोलिस स्थानकात नेले. सुमित सोनवणे असे या तरुणाचे नाव असून त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला व त्याला समज देऊन सोडण्यात आले. तक्रारीबाबत कारवाई करण्यासाठी असे प्रकार करण्याऐवजी सनदशीर मार्गाने कारवाईची मागणी करण्याबाबत पोलिसांनी त्याला समज दिली, अशी माहिती मरीन ड्राईव्ह पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बागूल यांनी दिली.