Vinayak Raut : "रवींद्र वायकर ठरले ईडीचे बळी, तर भास्कर जाधवांचं मन...", नेमकं काय म्हणाले विनायक राऊत? पाहा व्हिडिओ
Published : Mar 11, 2024, 11:00 PM IST
रत्नागिरी Vinayak Raut News : राज्य सरकारनं सिडकोबाबत काढलेल्या जीआर बाबत आज (11 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेनेकडून (उबाठा गट) आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी सिडकोबाबत काढण्यात आलेला जीआर फाडून तो पायदळी तुडवण्यात आला. यानंतर खासदार विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भास्कर जाधव यांची नाराजी तसंच रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "भास्कर जाधव यांचं स्थान आमच्या मनामध्ये, मोठं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांच्याशी योग्य वेळेला बोलतील आणि पुढचा मार्ग आम्ही काढू, भास्करराव मोठ्या मनाचे आहेत." पुढं ते म्हणाले की, "रवींद्र वायकर हे ईडीचे बळी ठरले आहेत. ईडीच्या तुरुंगाचा धाक दाखवून अशा प्रकारे प्रामाणिक कार्यकर्त्याला सतवलं जातंय, तसंच त्यांच्या कुटुंबाला देखील तुरुंगात टाकण्याची भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळं दुर्दैवानं त्यांना अशा पध्दतीचा निर्णय घ्यावा लागला."