'लेखी प्रतिज्ञापत्र देऊन अनेकजण पळून गेले' : विनायक राऊतांचा प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल - Vinayak Raut On Prakash Ambedkar
Published : Mar 8, 2024, 2:38 PM IST
रत्नागिरी Vinayak Raut On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीच्या काही मागण्यांवरुन हा तिढा आणखी वाढला आहे. यावरुनच खासदार विनायक राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुनावलं आहे. राऊत म्हणाले, देशात एकाधिकारशाही, संविधानाचा होत असलेला चुराडा याच्या विरोधात इंडिया आघाडी उभी राहिलेली आहे. त्या इंडिया आघाडीकडून लेखी मागण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. प्रतिज्ञापत्र करुन सुद्धा अनेक जण पळून गेले आहेत, हे प्रकाश आंबेडकर यांना माहिती आहे. त्यामुळं अशा पद्धतीची मागणी करणं कितपत योग्य आहे, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी लांजा इथं बोलताना केला. भाजपा वेळ पडल्यास 48 जागांवर निवडणूक लढवेल. गरज संपली की अरबी समुद्रात विसर्जन करणं हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाचंही ते विसर्जन करतील, अशी टीका देखील खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ऐका ते नेमकं काय म्हणाले.