महाराष्ट्र

maharashtra

पूजा खेडकरची उमेदवारी रद्द, विद्यार्थ्यांकडून कारवाईचं स्वागत - IAS Pooja Puja Khedkar

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 10:24 PM IST

पूजा खेडकर (Etv Bharat MH Desk)

पुणे Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची बुधवारी UPSC नं निवड रद्द केलीय. तसंच भविष्यात त्यांना कोणतीही UPSC परीक्षा देता येणार नाही. पूजा खेडकर यांच्यावर पालकांबद्दल चुकीची माहिती तसंच ओळख बदलून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा नागरी सेवा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर खेडकर यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं नागरी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वागत केलंय. खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून UPSC परीक्षा उत्तीर्ण केल्याचा देखील आरोप आहे. तसंच त्या सहा वेळा वैद्यकीय चाचणीला गैरहजर असल्याचं समोर आलं आहे. आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत यूपीएससीचा आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलंय. याबाबत आमच्या प्रतिनिधीनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details