महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नेपाळ बस दुर्घटना : रक्षा खडसे यांनी घेतली अपघातग्रस्तांची भेट; पाहा व्हिडिओ - Nepal Bus Accident - NEPAL BUS ACCIDENT

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 6:54 PM IST

मुंबई Raksha Khadse Reached Kathmandu : नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंची बस नदीत कोसळली. या अपघातात 24 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत. नेपाळमधील पोखरा शहराकडून काठमांडूला जाताना हा अपघात झाला. मृतांमध्ये काहीजण जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातले आहेत. या बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि आमदार संजय सावकारे हे नेपाळमध्ये दाखल झाले असून जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेत. तर मृतदेह भारतात परत आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसंच रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकारे यांनी आज काठमांडू येथे रुग्णांची भेट घेतली. त्रिभुवन युनिव्हर्सिटी टिचिंग हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्षा खडसे यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस केली. तसंच त्यांनी यावेळी अपघातग्रस्तांच्या उपचाराबाबत माहिती देखील घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details