महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कोकणची अनोखी होळी; आमदार भास्कर जाधवांनी लुटला पालखी नाचवण्याचा आनंद - Holi Festival 2024 - HOLI FESTIVAL 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 2:04 PM IST

रत्नागिरी Holi Festival 2024 : कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. राजकीय नेते सुद्धा शिमगोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या तुरंबव (ता. चिपळूण) या गावात होळीचा आनंद लुटला. यावेळी भास्कर जाधव यांनी ग्रामदेवता शारदादेवी मंदिराच्या सहाणेसमोर आज सकाळी होम लागल्यानंतर परंपरेप्रमाणं देवीची पालखी नाचवली. लहानपणापासून न चुकता ते पालखी खांद्यावर घेऊन नाचवत आले आहेत. "ही माझ्यासाठी एक वेगळी पर्वणी असते. या दिवसाची मी आतुरतेनं वाट पाहत असतो. आजदेखील माझी दोन्ही मुलं, पुतणे आणि ग्रामस्थांसमवेत मनमुराद पालखी नाचवली," अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली. कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. कोकणातील पालखी नाचवणं राज्यभरात सुप्रसिद्ध आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details