मुंबई - अभिनेता वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट 'बेबी जॉन' या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ॲटली यांनी केली आहे. याशिवाय चित्रपटाचं दिग्दर्शन कलिश यांनी केलंय. ख्रिसमस डेच्या शुभ मुहूर्तावर 'बेबी जॉन' बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहे. 'बेबी जॉन'चे आगाऊ बुकिंग सध्या सुरू झाले आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ॲक्शन ड्रामा चित्रपट 'पुष्पा 2 द रुल' अजूनही बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. 'बेबी जॉन' रिलीज झाल्यानंतर 'पुष्पा 2'ला नुकसान सहन करावे लागू शकते, असं सध्या दिसत आहे.
'बेबी जॉन'चं आगाऊ बुकिंग : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'बेबी जॉन'नं आतापर्यंत हिंदीमधील 2 डी (2D)मध्ये 3490 शोसाठी 16365 तिकिटे विकून 51,55264 लाख रुपये कमावले आहेत. याशिवाय या चित्रपटानं हरियाणा (5.14 लाख रुपये), तेलंगणा(4.12 लाख), कर्नाटक (3.74 लाख), पश्चिम बंगाल (3.65 लाख) आणि गुजरात (2.6 लाख रुपये) मध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. मुंबई ( 8.06 लाख), हैदराबाद (4.12 लाख) आणि बंगळुरू (3.74 लाख)मध्ये आगाऊ बुकिंगद्वारे या चित्रपटानं बरीच कमाई केली आहे. हा चित्रपट ओपनिंग डेला किती कमाई करेल यावर अनेकांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाकडून वरुण धवन आणि ॲटलीला खूप अपेक्षा आहेत. याशिवाय या चित्रपटातून कीर्ती सुरेशनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
'बेबी जॉन'ची होईल 'पुष्पा 2'बरोबर टक्कर : रुपेरी पडद्यावर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटानं फक्त 18 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1062 कोटी रुपये आणि जगभरात 1500 कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट रोजचं अनेक चित्रपटांचे विक्रम मोडून काढत आहे. दरम्यान सुरुवातीच्या दिवसात, 'बेबी जॉन' हा 50 लाखांपेक्षा जास्त कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'बेबी जॉन'ला 23 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत मोठी कमाई करण्याची संधी आहे. तसेच सध्या बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' व्यतिरिक्त 'मुफासा - द लायन किंग' देखील बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहेत.
हेही वाचा :