महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 5:16 PM IST

ETV Bharat / videos

रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांना जयपूरमध्ये श्रद्धांजली - Tribute to Ramoji Rao

जयपूर Tribute to Ramoji Rao : रामोजी समुहाचे अध्यक्ष पद्मविभूषण रामोजी राव (Ramoji Rao) यांच्या निधनानंतर देशभरात श्रद्धांजली सभांची फेरी सुरू आहे. बुधवारी, राजस्थानची राजधानी जयपूर येथील पिंकसिटी प्रेस क्लबमध्ये दिवंगत रामोजी राव यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये ईटीव्हीशी संबंधित दीर्घकाळ पत्रकार आणि माध्यम संस्थांचे विविध प्रतिनिधी, कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत. प्रेस क्लबतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जयपूर येथे आयोजित केलेल्या श्रद्धांजली सोहळ्यात सर्वांनी एकमताने दिवंगत रामोजी राव यांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जिद्दीविषयी चर्चा केली. रामोजी राव यांनी त्यांच्या हयातीत पत्रकारितेच्या सर्व आयामांमध्ये आदर्श घालून दिला होता. निःपक्षपाती पत्रकारितेसह मूल्याधारित बातम्यांवर त्यांनी भर दिला, जेणेकरून समाजाला दिशा मिळावी, यासाठी प्रादेशिक पत्रकारितेत दिवंगत रामोजीराव यांचे स्मरण कायम राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details