महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अनर्थ टळला: धावत्या एसटी बस आणि शिवशाहीचे निघाले चाक, पाहा व्हिडिओ - SHIVSHAHI AND ST BUS

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2025, 10:43 PM IST

अमरावती : परतवाडा येथील नगर परिषद शाळेची सहल रिद्धपूर येथे आज निघाली असताना, मधातच बसचं समोरील चाक अचानक वाकलं. या घटनेत बस चालकानं सावधपणे बस थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली. यामुळं राज्य ‌परिवहन‌ मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित ‌केलं जात आहे. असं असताना जिल्हा परिषद शाळेला सुट्टीच्या दिवशी सहलीला परवानगी कशी मिळाली? याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.



दुसरी घटना काय? : अमरावतीवरून नागपूरच्या दिशेनं निघालेली शिवशाही बसच्या चालकाच्या बाजूचं चाक चक्क निघून पळालं. चालकांनं प्रसंगावधान दाखवून धावती बस कशीबशी थांबवली. यामुळं मोठा अपघात टळला. शिवशाही बसमधून 50 हून अधिक प्रवासी अमरावतीवरून नागपूरला निघाले होते. या घटनेमुळं प्रवासी प्रचंड घाबरले. तर रविवारी घडलेल्या या दोन्ही गंभीर घटनेमुळं खळबळ उडाली असताना सुदैवानं कुठलाही अनर्थ घडला नाही. 

ABOUT THE AUTHOR

...view details