महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

टाटा मुंबई मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्षांनी दाखवला हिरवा झेंडा; हाफ मॅरेथॉनमध्ये सैन्यदलाच्या जवानांनी मारली बाजी - टाटा मुंबई मॅरेथॉन 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 7:29 AM IST

Updated : Jan 21, 2024, 3:40 PM IST

मुंबई : Tata Mumbai Marathon 2024 : आशियातील सर्वात मोठ्या ''टाटा मुंबई मॅरेथॉन''ला आज रविवार 21 जानेवारी सकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस येथून सुरुवात झाली. 42.197 किलोमीटरच्या या मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये एकंदरीत 59 हजार पेक्षा जास्त धावपटू सहभागी झाले. तसंच, मुख्य मॅरेथॉनमध्ये 10 हजार 911 धावपटूंनी सहभाग घेतला. या मॅरेथॉनमध्ये सावन बरवाल, किरण म्हात्रे, मोहन सैनी असे तिघजण विजयी झाले आहेत. हे तिघही सैन्यदलामधील जवान आहेत. टाटा मुंबई मॅरेथॉन ही फक्त आशियात नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. कारण या मॅरेथॉनला गोल्ड लेबल भेटलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. विविध कारणाने ही मॅरेथॉन प्रसिद्ध आहे. एकंदरीत 4 लाख 5 हजार रुपये इतकी बक्षीस राशी विजेत्यांना मिळते.  ही आशियातील सर्वात मोठी बक्षीसाची रक्कम असलेली मॅरेथॉन आहे. भारतीय मुख्य विजेत्याला पाच लाख रुपये,  तर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विजेत्याला पन्नास हजार यूएस डॉलर इतकी रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. ऑलम्पिक पदक विजेती आणि दोनदा जगजेती राहिलेली  ''होल्ट पट्टू केटी मून'' या मॅरेथॉनची मुख्य अँबेसिडर आहे.

Last Updated : Jan 21, 2024, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details