महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'भारत माता की जय'च्या घोषणा देत क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष, पाहा व्हिडिओ - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 12:08 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)T20 World Cup 2024: टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विजय मिळविला. टी इंडियानं तब्बल 17 वर्षांनी टी20 विश्वचषक जिंकलं आहे. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींयाचा उत्साह गगनाला भिडला आहे. सर्वत्र इंडिया टीमचे कौतुक केलं जातं आहे. जिंकल्यानंतर शहरातील मध्यस्थानी असलेल्या गुलमंडी परिसरात नागरिकांनी एकच जल्लोष केला. हातात तिरंगा झेंडा घेऊन "भारत माता की जय" अशा घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. यात आबालवृद्ध ते लहान मुलांपर्यंत सर्वच सहभागी झाले होते. महिलांनीदेखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. फटाके फोडून गाण्यांच्या तालावर ठेका धरत युवकांनी आनंद साजरा केला. तर दुचाकी आणि चार चाकी वाहनांमधूनदेखील हातात तिरंगा घेऊन आनंद व्यक्त केला. 

ABOUT THE AUTHOR

...view details