सैफ अली खानच्या इमारतीत आलेल्या 'त्या' लोकांची होणार चौकशी, पाहा व्हिडिओ - SAIF ALI KHAN ATTACK NEWS
Published : Jan 16, 2025, 1:54 PM IST
मुंबई -अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेच्या एकूण 7 टीम तयार केल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या सर्व टीम प्रकरणाच्या तपासात वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्या आहेत. चोर इमारतीत कसा आला? तो चोर कोण होता? त्याला घरातील कोणी मदत केली का? या सर्व प्रकरणात घरातील नोकरांपैकी, कर्मचाऱ्यांपैकी कोणी सामील आहे का? सामील असेल तर या मागचा उद्देश काय आहे? या सर्व दृष्टीनं सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. सध्याच्या घडीला सैफ अली खानच्या घरी गुन्हे शाखेच्या टीम दाखल आहेत. या टीमसोबत ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीमदेखील आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या इमारती परिसरात बऱ्याच प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच फुटेज तपासण्यात आलं. यात दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या आहेत. सध्या संशयित व्यक्तींचा शोध सुरू आहे. मागील काही दिवसांपासून सैफ अली खानच्या इमारतीत फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं. या कामासाठी आलेले मजूर मागील काही दिवसांपासून या इमारतीत येत होते. त्या मजुरांपैकी या चाकू हल्ल्यात कोणी सामील आहे का? याचादेखील तपास केला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.