लोकशाहीच्या मार्गाने नवनीत राणा यांची खासदारकी नक्की जाईल - रोहित पवार - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS
Published : Apr 4, 2024, 10:58 PM IST
बुलडाणा Rohit Pawar : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे न्यायालयाने जात प्रमाणपत्र वैध ठरवल्यानंतर त्यावर रोहित पवार यांनी आज (4 एप्रिल) बुलढाण्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवलं असलं तरी लोकशाहीच्या मार्गाने त्यांची खासदारकी नक्की जाईल. तिथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल."
या प्रश्नावर बोलण्यास नकार : बुलढाणा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता रोहित पवार बुलढाण्यात आले असताना त्यांनी पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिले. पण जेव्हा अजित पवार आणि पवार कुटुंब एकत्र येतील का? यावर त्यांनी भाष्य करण्यात टाळलं. मी आज इथे लोकांच्या प्रश्नांना आणि प्रचाराकरता आलो आहे असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.