रविकांत तुपकर महाविकास आघाडीत सहभागी होणार? नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - RAVINDRA TUPKAR MEET SHARAD PAWAR
Published : Oct 15, 2024, 1:08 PM IST
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी तसंच राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (15 ऑक्टोबर) शरद पवारांची भेट घेण्यासाठी पुण्यातील मोदी बागेत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील पवारांची भेट घेतली. भेटीपूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "आमच्या समर्थकांचं म्हणणं आहे की आम्ही आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत सहभागी व्हावं. त्यामुळंच आज चर्चेसाठी मी इथं आलोय. आम्ही महाविकास आघाडीसोबत युती करावी अशी राज्यातील अनेकांची इच्छा असून त्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी मला बोलावलं होतं. त्यांच्याशी देखील याविषयी आमची सविस्तर चर्चा झाली होती."