महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"धंगेकर संपलेला नाही, कसब्यात अजूनही 'हू इज धंगेकर' सुरूच"; पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2024, 8:56 PM IST

पुणे : राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. राज्यभर चर्चा सुरू असलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वातावरण तापलं आहे. कसबा मतदार संघात मध्यंतरी झालेल्या पोटनिवडणुकीत 'हू इज धंगेकर' हा विषय खूपच गाजला होता. आता पुन्हा 'हू इज धंगेकर'ची चर्चा सुरू झाली. धंगेकर अजूनही संपलेला नाही. कसब्यात अजूनही 'हू इज धंगेकर' सुरूच आहे, असं यावेळी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर म्हणाले. 'ईटीव्ही भारत'चे पुण्याचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी रविंद्र धंगेकर यांच्यासोबत खास संवाद साधला.

"कसबा पेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भाजपाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग बाकी आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास कसबा पेठेतील विकासाचा हा बॅकलॉग येत्या पाच वर्षात आपण भरून काढू आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांनी या कसबा मतदार संघाचे मतदार निवडून देतील," असं यावेळी धंगेकर म्हणाले. 

ABOUT THE AUTHOR

...view details