यंदा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार जिंकणार; रमेश बागवे यांचा विश्वास
Published : Oct 19, 2024, 8:41 PM IST
पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात सर्वच पक्षांकडून उमेदवारी जाहीर होणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास अशी लढत होणार आहे. अश्यातच पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आमदार रमेश बागवे हे इच्छुक आहेत. बागवे यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाला असल्याचं सांगितलं जातंय.अश्यातच पुणे कँटोन्मेंट मतदार संघातील प्रश्न तसेच शहरातील इतर विषयांवर बागवे यांना विचारलं असता त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच यंदा पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी होणार असल्याचं विश्वास बागवे यांनी व्यक्त केला.