पुण्यातील मंदिरात 'राममय' वातावरण; मोठ्या प्रमाणात गर्दी, पाहा व्हिडिओ - पाहा व्हिडिओ
Published : Jan 22, 2024, 1:02 PM IST
|Updated : Jan 22, 2024, 2:41 PM IST
पुणे Ram Mandir Darshan in Pune : आज अयोध्या इथं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामुळं संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण असून सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. यानिमित्त पुण्यात देखील ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील तुळशीबाग येथील ऐतिहासिक राम मंदिरात सकाळ पासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज सकाळपासूनच नागरिकांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलीय. मंदिरात सकाळपासून रामरक्षा स्तोत्र पठण, सुधारामायनाची गाणी, तसंच श्रीराम राज्याभिषेक सोहळा, श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, श्रीरामाचा पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन पुण्यातील या राम मंदिरात करण्यात आलंय. एकंदरीतच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आलीय. तसंच सगळीकडं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.